जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया
जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

sakal_logo
By

खारघरमध्ये जलवाहिनी फुटली
हजारो लिटर पाणी वाया

खारघर, ता. ८ (बातमीदार) : खारघर वसाहतीत गेल्‍या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई असून नागरिक हैराण झाले आहेत. त्‍यातच बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास गुरुद्वारा परिसरात जलवाहिनी फुटल्‍याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे आधीच खारघरमधील बहुतांश नागरिक त्रस्‍त आहेत. सेंट्रल पार्कजवळ गुरुद्वारा परिसरात जलवाहिनी फुटल्‍याने रस्‍ता जलमय झाला होता. याबाबत माहिती मिळताच सिडकोच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी घटनास्‍थळी दाखल झाले आणि त्‍यांनी दुरुस्‍तीचे काम हाती घेतले.
सेंट्रल पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना जलवाहिनी फुटल्‍याचे निदर्शनास आले. सकाळी आठच्या सुमारास पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी दुरुस्‍तीचे काम हाती घेतले, मात्र तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले होते.
सिडकोच्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ३ आणि ४ चार जूनला पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे खारघर परिसरात कमी दाबाने पाणीरवठा होत असताना बुधवारी सकाळी जलवाहिनी फुटल्‍याने हजारो लिटर पाणी वाया गेले. परिणामी सेक्टर ३० ते ३६ मधील काही भागांत पुरेसा पाणीपुरवठा झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85048 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top