महाराजांच्या पुतळ्यासाठी तीनशे कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराजांच्या पुतळ्यासाठी तीनशे कोटी
महाराजांच्या पुतळ्यासाठी तीनशे कोटी

महाराजांच्या पुतळ्यासाठी तीनशे कोटी

sakal_logo
By

भिवंडी, ता. ८ (बातमीदार) ः भिवंडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी महापालिकेस उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासह शिवप्रेमी नागरिकांकडून याचे स्वागत करण्यात येत आहे. महापौर प्रतिभा पाटील यांनी शिवसेना, भाजपसह सर्वपक्षीय नेते, गटनेते, नगरसेवकांची विशेष बैठक आयोजित केली. यात पुतळा उभारणीसंदर्भात चर्चा करून तज्ज्ञ नागरिक व नगरसेवकांची विशेष समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. याप्रसंगी पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ, सभागृह नेते सुमित पाटील, माजी महापौर विलास पाटील, संजय म्हात्रे, संतोष शेट्टी, मनोज काटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भिवंडी शहरातील गोकुळ नगर रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३७ वर्षांपूर्वी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची दुरुस्ती व सुशोभीकरण कामासाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा उभारणीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिला आहे. महापौरांनी आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थितांनी नवीन पुतळा व दुरुस्ती करण्यासंदर्भात होणाऱ्या खर्चाचा आढावा घेऊन आपली मते मांडली. शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांनी यासंदर्भात सर्वपक्षीय नागरिकांची एक समिती स्थापन करावी अशी सूचना केली. त्यामुळे महापौर प्रतिभा पाटील यांनी पुतळ्यासंदर्भात व सुशोभिकरणाबाबतीत तज्ज्ञ नागरिकांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85055 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top