मढ-वेसावा फेरीबोट दरवाढ रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मढ-वेसावा फेरीबोट दरवाढ रद्द
मढ-वेसावा फेरीबोट दरवाढ रद्द

मढ-वेसावा फेरीबोट दरवाढ रद्द

sakal_logo
By

मालाड, ता. ८ (बातमीदार) ः मढ-वेसावा फेरी बोट दरवाढ रद्द झाली आहे. मुंबई काँग्रेस वार्ड ५१ तर्फे व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मढ वर्सोवा फेरी बोटीच्या दुचाकीसाठी वाढवलेल्या दराविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीने वाढीव दर लागू न करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत संस्थेचे उपाध्यक्ष संदीप भांजी यांनी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मागील ७० वर्षांपासून प्रवासी बोटीची सेवा सुरू आहे. ती ना नफा ना तोटा या सहकारी तत्त्वावर सुरू आहे. तसेच मागील तीन वर्षांपासून वाढलेल्या महागाईच्या उच्चांकामुळे दरवाढ प्रस्तावित केली होती, मात्र ग्रामस्थांच्या विरोधानंतर त्यांच्या भावनांचा आदर करत प्रस्तावित दरवाढ रद्द करत आहोत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85058 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top