पूरपरिस्थितीची माहिती आधीच मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूरपरिस्थितीची माहिती आधीच मिळणार
पूरपरिस्थितीची माहिती आधीच मिळणार

पूरपरिस्थितीची माहिती आधीच मिळणार

sakal_logo
By

कल्याण, ता. ८ (बातमीदार) : मान्सूनचे आगमन अद्याप झाले नसले तरी कल्याण-डोंबिवली पालिकेने शहरात पूरस्थिती उद्‌भवू नये यासाठी खबरदारीचे प्रयत्न सुरू केले आहेत. कल्याण शहरातील अनेक भाग नाले, नदी, खाडीकिनारी असून, पावसाळ्यात या भागांना पुराचा फटका बसतो. या पार्श्वभूमीवर पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरातील १० मुख्य ठिकाणी फ्लड सेन्सर्स बसवले आहे. याद्वारे नागरिकांना पूरस्थितीची आगाऊ माहिती मिळणार आहे.
कल्याण पश्‍चिम-पूर्वसह पालिका हद्दीतील लोकवस्ती नाले आणि नदी काठावर वसली आहे. दरवर्षी पावसाळ्यात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होतात. यावर खबरदारी म्हणून पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत १० ठिकाणी फ्लड सेन्सर्स बसवले आहेत. या फ्लड सेन्सर्सच्या माध्यमातून पूर येण्याच्या सुमारे अर्धा ते पाऊण तास आधीच प्रशासनाला अलर्ट मिळणार असल्याने संभाव्य नुकसान टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

...असे करणार काम
१) फ्लड स्नेसर्स लेझर किरणांच्या माध्यमातून खाडी आणि नदीतील पाण्याची पातळी सतत तपासणार आहेत. पावसाळ्यात पाण्याची पातळी जसजशी वाढेल तसा स्मार्ट सिटी कंट्रोल आणि कमांड सेंटरला त्याचा अलर्ट मिळेल. ज्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याचे प्रशासनाला लगेचच लक्षात येईल. ज्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास वेळ मिळेल.
२) कल्याणमध्ये बसवण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या डिस्प्ले बोर्डवरही वाढत्या पाणी पातळीबाबत माहिती दाखवली जाईल. तसेच शहरात २८ ठिकाणी बसवण्यात आलेल्या उद्‌घोषक यंत्रणेच्या माध्यमातूनही नागरिकांना पुराची सूचना दिली जाईल, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आयटी विभागाचे प्रमुख प्रशांत भगत यांनी दिली.

येथे बसवणार फ्लड सेन्सर्स
जी. के. पम्पिंग स्टेशन पत्रिपूल, कल्याण पश्चिम; भवानी चौक गणेश घाट, कल्याण पश्चिम; स्मशान घाट चिंचपाडा टिटवाळा पश्चिम; साकेत कॉलेज, कल्याण पूर्व; मोहने जलशुद्धीकरण केंद्र, मोहिली जलशुद्धीकरण केंद्र, रेती बंदर, कल्याण खाडी, आधारवाडी एसटीपी, सोनवणे कॉलेज, टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र.

फ्लड सेन्सर्सच्या माध्यमातून पूर येण्याची पूर्वसूचना प्रशासनाला अगोदरच मिळणार आहे. त्यामुळे जीवित आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मोठी मदत होईल.
- प्रशांत भगत, आयटी विभाग प्रमुख, स्मार्ट सिटी प्रकल्प

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85076 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top