मान्सूनपूर्व नालेसफाई कामांचा आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मान्सूनपूर्व नालेसफाई कामांचा आढावा
मान्सूनपूर्व नालेसफाई कामांचा आढावा

मान्सूनपूर्व नालेसफाई कामांचा आढावा

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : मान्सूनच्या आगमनाला काही कालावधी शिल्लक असल्याने प्रभाग समिती अ कार्यालयामध्ये नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रभाग समिती अ सभापती संजना कदम यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांच्या बैठकीचे आज (ता. ८) आयोजन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नीलेश बाविस्कर, रामजी बेरा, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, प्रभाग समिती अधिकारी जितेंद्र मढवी, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

ग्रामीण भागातील नालेसफाईबाबत आढावा घेण्यात आला. तसेच शहरी भागांमध्ये असणारे अडथळे अडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच प्रशासनास या अडचणी दूर करता येतील व कामे योग्य पद्धतीने होतील, यासाठीचा विचारविनिमय करण्यात आला. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नालेसफाईसंदर्भात चर्चा केली. पावसाळ्यामध्ये सखल भागांमध्ये पाणी भरते, त्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा उपसा करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85109 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top