
पालघर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.७७ %
पालघर, ता. ८ (बातमीदार) ः बारावीचा निकाल जाहीर झाला असून पालघर जिल्ह्याचा निकाल ९१. ७७ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ७.७५ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९९.५२ टक्के इतका होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९२.९२ टक्के, तर मुलांचा निकाल ९०.८६ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल जव्हार तालुक्याचा ९७.३२ टक्के आहे.
जव्हार तालुक्यापाठोपाठ मोखाडा व तलासरी तालुक्यांचा निकाल ९५ टक्क्यांच्या जवळपास आहे. विक्रमगड, पालघर, वाडा, वसई, विक्रमगड तालुक्यांचा निकाल ९० ते ९२ टक्क्यांच्या जवळपास आहे. डहाणू तालुक्याचा निकाल यंदा कमी लागला आहे. तो ८०.८२ % आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा डहाणू तालुक्याच्या निकालात सुमारे वीस टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या वर्षी डहाणू तालुक्याचा निकाल ९९.९३ % इतका होता. बारावीसाठी पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ४८०९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४४१४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये २४३७३ मुले, तर १९७६७ मुली आहेत; तर पुनर्परीक्षेला बसलेल्या १०६२ विद्यार्थ्यांपैकी ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85116 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..