मिरा भाईंदर पालिकेकडून इम्पिरिकल डाटा जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा भाईंदर पालिकेकडून इम्पिरिकल डाटा जमा
मिरा भाईंदर पालिकेकडून इम्पिरिकल डाटा जमा

मिरा भाईंदर पालिकेकडून इम्पिरिकल डाटा जमा

sakal_logo
By

भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : ओबीसी आरक्षणासंदर्भात मिरा भाईंदरमधील इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता गोळा करण्यात आलेली माहिती संकलित करून लवकरच ती राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे. त्यानुसार मिरा-भाईंदरमध्येही महापालिकेने ही माहिती तीन दिवसांत गोळा केली आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी मतदार याद्यांच्या एकंदर ६०६ भाग याद्यांच्या मदतीने ६०६ कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांची जातनिहाय माहिती गोळा केली आहे. यात इतर मागासवर्गीय (ओबीसी), विशेष मागासवर्गीय (एसबीसी) आणि एनटी आदींची नोंद करण्यात आली आहे. ही सर्व माहिती राज्य सरकारने दिलेल्या नमुन्यात नोंदवण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच ती माहिती सरकारकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85117 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top