
खर्डीतील जिवनदीप महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल
खर्डी, ता. ८ (बातमीदार) : १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेत खर्डीतील जीवनदीप महाविद्यालयाने कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखांमध्ये १०० टक्के बाजी मारली असून कला शाखेत वैशाली गवारी(८१.६७ टक्के), वाणिज्य शाखेत संजू चौधरी (७८.१७ टक्के) व विज्ञान शाखेत आर्या तुपे (७७ टक्के) यांनी प्रथम क्रमांक पटकावले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य कैलास कळकटे, पोलिस पाटील शाम परदेशी, माजी सरपंच दिलीप अधिकारी, प्रशांत खर्डीकर, भाग्यश्री डिगे, भगवान मोकाशी यांनी उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
खर्डी ज्युनियर महाविद्यालयात कला शाखेत अंकिता भोईर (७६.३३ टक्के) व वाणिज्य शाखेत कल्याणी विशे (८२.३३ टक्के) गुण मिळवून प्रथम आल्या असून या महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ९१ टक्के लागला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85122 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..