कार्यकर्त्या वेणूबाई बुकले यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यकर्त्या वेणूबाई बुकले यांचे निधन
कार्यकर्त्या वेणूबाई बुकले यांचे निधन

कार्यकर्त्या वेणूबाई बुकले यांचे निधन

sakal_logo
By

मनोर, ता. ८ ः महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कारप्राप्त आदिवासी कार्यकर्त्या आणि कोंढाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वेणुबाई बुकले (वय ६९) यांचे दीर्घ आजाराने बुधवारी (ता. ८) पहाटे राहत्या घरी निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक जीवनात कार्यरत होत्या. काळूराम धोदडे यांच्यासोबत भूमिसेनेत असताना अनेक आंदोलनांत त्यांनी भाग घेतला होता. आदिवासींच्या हक्कांच्या लढ्यात त्या अग्रणी असायच्या. आदिवासींची संस्कृती टिकवण्यासाठी त्या अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिल्या. महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देण्यात आला होता. आदिवासींच्या हक्कांसाठी जागरूक असल्याने शासकीय विभागामध्ये त्यांचा दरारा होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85124 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top