नशामुक्तीसाठी जमात ए इस्लामीचे प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नशामुक्तीसाठी जमात ए इस्लामीचे प्रयत्न
नशामुक्तीसाठी जमात ए इस्लामीचे प्रयत्न

नशामुक्तीसाठी जमात ए इस्लामीचे प्रयत्न

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. ९ (बातमीदार) ः अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईला नशामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुंबईतील जमात-ए-इस्लामी संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र आणि गोवा एनसीबीची कमान हाती घेतलेल्या अमित घावटे यांची भेट घेतली.
जमात-ए-इस्लामी हिंद मुंबईचे पदाधिकारी सचिव शाकीर शेख, रियाझ शेख, मौलाना शब्बीर आणि अबू बकर अत्तारी यांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मार्गदर्शन मिळण्याकरिता घावटे यांची भेट घेतली. जमात-ए-इस्लामी हिंद संघटना मुंबई शहरात २० ठिकाणी अमली पदार्थविरोधी उपक्रम नियमितपणे राबवत आहे. अलीकडेच जमात-ए-इस्लामी हिंदवर आधारित अशरफ खाननिर्मित लघुपट ‘काश’ ला वर्ल्ड फिल्म कार्निवल सिंगापूरतर्फे सन्मानित करण्यात आले. अमित घावटे यांनी हा चित्रपट लोकांनी आवर्जून पाहावा, अशी इच्छा व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85170 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top