अखेर पालिकेचे बॅरिकेड लागले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर पालिकेचे बॅरिकेड लागले!
अखेर पालिकेचे बॅरिकेड लागले!

अखेर पालिकेचे बॅरिकेड लागले!

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ९ (बातमीदार) ः घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर जलवाहिनीसाठी केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी पालिकेचे बॅरिकेटेड लागल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बुधवारी (ता. ८) बॅरिकेट लावून सुरक्षेची उपाययोजना केल्याचे दिसून आले.
अण्णा भाऊ साठेनगरासमोर घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता जलवाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आला होता. कामानंतर तो रस्ता भराव टाकून पूर्ववत करणे किंवा त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेट लावणे गरजेचे होते. दोन्हीपैकी एकही गोष्ट न केल्यामुळे वेगात येणाऱ्या वाहनांच्या चालकांना अनपेक्षितरीत्या खड्डा दिसायचा व त्यामुळे वाहन आदळू नये यासाठी ते वेग कमी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्या वाहनाच्या मागून येणारे वाहन त्याला धडकण्याची भीती निर्माण झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85171 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top