
सफाई कामगारांसाठी कोविड भत्त्याची मागणी
बेलापूर, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका प्रशासनामध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांकडे केली आहे. सध्या शहरामध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. कोरोना महामारीच्या तीनही लाटेमध्ये परिवहन उपक्रमाच्या सफाई कामगारांनी प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे. कोरोना रुग्णांना घरापासून, तसेच नागरी आरोग्य केंद्रापासून कोविड केंद्रापर्यंत एनएमएमटीच्या बसेसमधून आणले जात होते व सोडलेही जात होते. बसेसना रुग्णवाहिकेचे स्वरूप देण्यात आले होते. या बसेसची दररोजची सफाई, बसेस धुणे आदी कामे दररोज सफाई कामगार करत होते; मात्र त्यांना आजतागायत कोविड भत्ता महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही. या कर्मचाऱ्यांना तत्काळ कोविड भत्ता उपलब्ध करून देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85192 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..