मराठी ग्रंथ संग्रहालयात काव्य कट्ट्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी ग्रंथ संग्रहालयात काव्य कट्ट्याचे आयोजन
मराठी ग्रंथ संग्रहालयात काव्य कट्ट्याचे आयोजन

मराठी ग्रंथ संग्रहालयात काव्य कट्ट्याचे आयोजन

sakal_logo
By

ठाणे (बातमीदार) : मराठी ग्रंथ संग्रहालयात शनिवारी (ता. ११) काव्य कट्ट्याचे चौथे पुष्प गुंफण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी डॉ. महेश केळुसकर हे त्यांचा ४० वर्षांचा काव्य प्रवास उलगडणार आहेत. नवीन वर्षात मराठी ग्रंथ संग्रहालयाने सुरू केलेल्या काव्य कट्ट्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात वृंदा दाभोलकर या सूत्रधार, तर संवादक म्हणून कवी कॅप्टन वैभव दळवी हे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात पार पडणार आहे. तेव्हा अधिकाधिक रसिकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85197 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top