कामोठ्यातून एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामोठ्यातून एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त
कामोठ्यातून एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त

कामोठ्यातून एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ ः राज्य सरकारने बंदी घातलेल्या आणि ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि इतर साहित्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रायगड विभागातर्फे करवाईचे सत्र सुरू आहे. रायगड विभागाच्या अधिकाऱ्यांनी ७ जूनला कामोठे येथे टाकलेल्या धाडीत तब्बल एक टन प्लास्टिकचे साहित्य व पिशव्या जप्त केल्या. एमपीसीबीच्या कारवाईमुळे बेकायदा प्लास्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर सरकारने बंदी घातली आहे; तरीसुद्धा बाजारपेठांमध्ये सर्रासपणे या पिशव्यांचा वापर केला जातो. अशा पिशव्या विक्रेत्यांवर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली आहे. त्यानुसार रायगड विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून क्षेत्र अधिकारी अभिजित लोहिया व रूपाली सोनकांबळे यांनी कामोठ्यातील होलसेल प्लास्टिक विक्री दुकानावर धाड टाकली.
कारवाईत कामोठे, सेक्टर १० येथील राजेश्वर ट्रेडर्स दुकानात प्लास्टिकच्या पिशव्या, किराणा बॅग, दूध बॅग, चमचे, ग्लास, जेवणाच्या पत्रावळ्या आदी २०० किलो आणि दुकानाच्या गोदामातून ८०० किलो असा एकूण एक टन प्लास्टिकचा माल हस्तगत केला. या ठिकाणी प्लास्टिकचा माल घेऊन आलेल्या टेम्पोचालकावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालकाकडून पाच हजार रुपये आणि प्लास्टिक विक्रेत्याला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
एमपीसीबीने केलेल्या कारवाईत तब्बल एक लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. धाड टाकून हस्तगत केलेला माल विल्हेवाट लावण्यासाठी पनवेल महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85208 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top