तीन मजली घर कोसळून वांद्र्यात एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन मजली घर कोसळून वांद्र्यात एकाचा मृत्यू
तीन मजली घर कोसळून वांद्र्यात एकाचा मृत्यू

तीन मजली घर कोसळून वांद्र्यात एकाचा मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : वांद्रे पश्चिम परिसरातील महाराष्ट्र नगर, शास्त्री नगरमध्ये बुधवारी मध्यरात्री इमारतवजा तीन मजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका रहिवाशाचा मृत्यू झाला. शाहनवाज (४०) असे मृत रहिवाशाचे नाव आहे. जखमी झालेल्या १७ जणांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. एका जखमीवर अद्याप उपचार सुरू आहेत.

वांद्रे पश्चिम पूर्व द्रुतगती महामार्गालगत महाराष्ट्र नगर प्लॉट क्र. ३ शास्त्री नगरमध्ये रात्री १२.१५ च्या सुमारास दुर्घटना घडली. तीन मजली घर कोसळल्याने मोठा आवाज झाला. घराच्या ढिगाऱ्यामध्ये १८ जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. सर्व जखमींना तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या शाहनवाज यांचा मृत्यू झाला. इतर जखमींना किरकोळ जखमा झाल्या होत्या. भाभा आणि खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. १८ जखमींमध्ये दोन मुले, ६० वर्षांवरील तीन व्यक्ती आणि तरुणांचा समावेश आहे. एका जखमीवर अजून उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, दुर्घटनेबाबत पोलिस आणि अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85242 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top