राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट निर्मिती स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट निर्मिती स्पर्धा
राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट निर्मिती स्पर्धा

राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट निर्मिती स्पर्धा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानांतर्गत १ ते ३० जूनदरम्यान राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफीत निर्मिती स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी केले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व यू-ट्युब ब्लॉगर यांना सहभागी होता येणार आहे.
राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक एक लाख रुपये व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह व सोबतच प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. चित्रफीत जिल्हास्तरावर सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून आहे. या तारखेपर्यंत जिल्हा स्तरावर सहभागी एकूण स्पर्धकांपैकी उत्कृष्ट पाच स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच त्यांच्या चित्रफिती राज्य कक्षाकडे पाठवण्यात येतील आणि ३० जूनपर्यंत अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल. चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त सात मिनिटे एवढा असावा, चित्रफीत ही एचडी दर्जाची असावी, चित्रफीत अप्रकाशित असावी. लघुपट निर्मिती व्यावसायिक, हौशी, स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्यासह सर्वसामान्य नागरिक यांनाही या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेचे विषय, नियम, प्रवेश अर्ज व इतर माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक हसन तडवी यांच्याशी ८९२८१४०९२० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत, तसेच आपल्या तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद पंचायत समिती येथे संपर्क करावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85248 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top