सूचना व हरकतींवरील अहवाल अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूचना व हरकतींवरील
अहवाल अंतिम टप्प्यात
सूचना व हरकतींवरील अहवाल अंतिम टप्प्यात

सूचना व हरकतींवरील अहवाल अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडत प्रक्रियेवर २३२ सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या सूचना आणि हरकतींची दखल महापालिकेला घ्यावी लागणार आहे. तसेच त्यावरील निर्णय घेऊन निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्रभाग आरक्षणाची राजपत्रातील घोषणा ही येत्या १३ जूनला होईल, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार सूचना आणि हरकतींवर योग्य ती दखल घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत जनसुनावणी घेण्यात आली होती; पण सूचना आणि हरकतींवर मात्र जनसुनावणी घेण्यात येणार नाही. आयोगाकडून या टप्प्यात कोणतीही जनसुनावणी घेण्याचे आदेश नाहीत असेही कबरे म्हणाले. सूचना आणि हरकतींवर महापालिकेला योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार २३२ पैकी काही सूचना आणि हरकतींवर महापालिकेकडून दखल घेण्यात येईल. तसेच या सर्व प्रक्रियेचा अहवाल हा राज्य निवडणूक आयोगाला येत्या दिवसांमध्ये दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85263 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top