
ते एमआयएम, अबू आझमींमागे व्यस्त
राज्यसभा निवडणूक ः
डोंबिवली, ता. ९ ः भाजप आमदार आशीष शेलार यांनी राज्यसभा निवडणूक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवल्याचे वक्तव्य केल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे; मात्र यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. इगो बाजूला ठेवून राज ठाकरे यांना मतदानासंबंधित विचारणा केली असती तरी त्यांनी त्यावर विचार केला असता, परंतु काही लोक एमआयएम आणि अबू आझमी यांच्यामागे व्यस्त असल्याने कदाचित त्यांनी तसा विचार केला नसावा, असा अप्रत्यक्ष टोला राजू पाटील यांनी शिवसेनेला लगावला.
आमदार राजू पाटील यांनी गुरुवारी दिव्यात नागरिकांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसभा निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले, की आमदार आशीष शेलार यांनी भाजपला राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे यांना विनंती केली होती. राज ठाकरे यांनीही त्यांना सकारात्मता दर्शवली. अन्य काही जणांनी इगो बाजूला ठेवून मतदानाबद्दल विचारणा केली असती तरी राज ठाकरे यांनी तोही विचार केला असता, परंतु हे लोक एमआयएम आणि अबू आझमी यांच्या मागे व्यस्त असल्याने त्यांनी हा विचार कदाचित केला नसेल. भाजप नेत्यांनी हा विचार केला, असे सांगत त्यांनी शिवसेनेला टोला लागवला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरून विचारणा करून ते जो निर्देश देतील तो निर्णय घेतला जाईल, असेही राजू पाटील या वेळी म्हणाले.
अद्याप आदेश नाही!
आशीष शेलार यांनी मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्याचे वक्तव्य केले असले, तरी त्यावर राजू पाटील यांनी कोणतेही शिक्कामोर्तब केलेले नाही. म्हणजेच त्यांना अद्याप राज ठाकरे यांचा आदेश आला नसल्याचे समजते. त्यामुळे आता ते कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात हे लवकरच समजेल.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85276 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..