आपल्या शहरातील ‘सासुरवास'' पहा ः राजू पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपल्या शहरातील ‘सासुरवास'' पहा ः राजू पाटील
आपल्या शहरातील ‘सासुरवास'' पहा ः राजू पाटील

आपल्या शहरातील ‘सासुरवास'' पहा ः राजू पाटील

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ९ ः बाहेर पडलाच आहात तर कल्याण-डोंबिवलीत फक्त पाहणी करा. डोंबिवलीशी आपले नाते आहे. आपल्याच शहरात चाललेला ‘सासुरवास’ पाहा अशा खोचक शब्दात आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाणीप्रश्‍नावर ट्विट केले आहे. तसेच पालकमंत्र्यांना सिनेमा प्रमोशन व दौऱ्यातून वेळ मिळाला, तर सोबत घेऊन या, पाण्यावाचून पाणावलेले डोळे पुसायलासुद्धा जरा वेळ द्या, असा टोला राजू पाटील यांनी ट्विटद्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना लागावला आहे. कल्याण ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत आहेत. पाणीटंचाईमुळे देसले पाड्यातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पालिकेने त्यावर तात्पुरती उपाययोजना केली असली, तरी प्रश्‍न मिटलेला नाही. याच मुद्द्यावर राजू पाटील यांनी हे खोचक ट्विट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85281 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top