वाशीत बँकेचे कार्यालय जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीत बँकेचे कार्यालय जळून खाक
वाशीत बँकेचे कार्यालय जळून खाक

वाशीत बँकेचे कार्यालय जळून खाक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : वाशी रेल्वे स्थानकालगतच्या बीएसईएल टॉवरमधील नोवा स्कोटिया बँकेच्या कार्यालयाला गुरुवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत सहाव्या मजल्यावरील बँक जळून पूर्णतः खाक झाली असून कर्मचाऱ्यांनी वेळीच कार्यालयातून बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ४० कर्मचाऱ्यांची सुटका करत अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

स्कोटिया बँकेच्या कार्यालयात दुपारी १ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे धूर पसरल्याने कर्मचाऱ्यांनी तात्काळ बँकेबाहेर धाव घेतली. मात्र अचानक आग लागल्याने घाबरलेले कर्मचारी बँकेच्या कार्यालयाच्या बाजूच्या कार्यालयात गेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्वात आधी कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढले. त्यानंतर अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत कार्यालयातील सर्व कॉम्प्युटर, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले होते. या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85284 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top