Prophet Row | मुंबई पाेलिसांचा नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांना समन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Police summons Nupur Sharma Naveen Jindal
नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांना समन्स

मुंबई पाेलिसांचा नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांना समन्स

भिवंडी : एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. याच्या निषेधार्थ आज भिवंडीत रजा अकादमीतर्फे भिवंडी शहर पोलिस ठाण्यात नूपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याबाबत जबाब नोंदवण्यासाठी भिवंडी पोलिसांनी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांना समन्स बजावला आहे.

रजा अकादमीचे पदाधिकारी वकार अ. सगीर अहमद मलिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भिवंडी पोलिसांनी नूपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे; तर तंजीम उलमा अहले सुन्नत या संस्थेचे पदाधिकारी मुफ्ती मुबशीर रजा यांनी ४ जून रोजी दिलेल्या तक्रारीनुसार नवीन जिंदाल यांच्याविरोधातही भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांच्या संदर्भात आपला जबाब नोंदवण्यासाठी व तपासासाठी पोलिसांनी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांना समन्स बजावले आहे. दरम्यान, नूपुर शर्मा यांच्याविरोधात कारवाई व्हावी, या मागणीसाठी मागील दोन दिवसांपासून समाजमाध्यमावर अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी ‘बंद’ असल्याची अफवा पसरवली आहे. याबद्दल पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण शहरातील मशिदीच्या मौलाना मौलवी यांना पोलिस ठाण्यात आमंत्रित करून भिवंडीत शांतता राखण्याचे आवाहन केले. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85294 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top