वाशी-ठाणे लोकलसेवा ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशी-ठाणे लोकलसेवा ठप्प
वाशी-ठाणे लोकलसेवा ठप्प

वाशी-ठाणे लोकलसेवा ठप्प

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : पहिल्याच पावसाने गुरुवारी सायंकाळी ट्रान्स हर्बर मार्गावरील वाशी सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरेड वायर तुटल्याने वाशी-ठाणे दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली. ऐन सायंकाळच्या वेळी हा प्रकार घडल्याने घराकडे निघालेल्या चाकरमान्यांचे भर पावसात चांगलेच हाल झाले. रेल्वे प्रशासनाने या घटनेनंतर ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. त्यामुळे वाशीहून ऐरोली-ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या तसेच ठाण्याहून वाशीत येणाऱ्या प्रवाशांना भर पावसात पर्यायी मार्गाचा वापर करून आपले घर गाठावे लागले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85300 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top