पहिल्या पावसात ठाण्यात झाडांची पडझड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या पावसात ठाण्यात झाडांची पडझड
पहिल्या पावसात ठाण्यात झाडांची पडझड

पहिल्या पावसात ठाण्यात झाडांची पडझड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० ः गुरुवारी सायंकाळी आभाळ भरून आल्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्‍‌यासह पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसाने शहरात सहा ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. त्यात दोन ठिकाणी वृक्ष पडून घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ठाणे शहरात यापूर्वी पावसाळ्यात धोकादायक वृक्ष पडून नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी पालिकेने शहरातील वृक्षांची पाहणी करून १०६ वृक्ष धोकादायक ठरविले होते. त्यापैकी सुकलेल्या अवस्थेत असलेले ८० वृक्ष काढून टाकले होते. असे असतानाही गुरुवारी सायंकाळी झालेल्या पहिल्या पावसानंतर शहरात सहा ठिकाणी वृक्ष पडण्याच्या तर चार ठिकाणी वृक्षाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या.

या ठिकाणी वृक्ष पडले
- तीन हात नाका सिग्नलजवळील सेवा रस्त्यावर लखानी इस्टेटसमोर
- बाळकुम येथील राम मारुती नगरमधील रुणवाल टॉवरसमोर
- राबोडी येथील सरस्वती शाळेजवळ
- खारेगाव येथील अमृतांगण सोसायटी, फेज-२ मधील बिल्डिंग नंबर- ८ समोरील रस्त्यावर
- कळवा पूर्व येथील भास्कर नगरमधील प्रगती मित्रमंडळ समोर राहणारे राम नारायण सिंग यांच्या घरावर
- दिवा येथील गणेश नगरमधील गणेश कृपा चाळीमधील दोन घरांवर

दरम्‍यान या सर्वच ठिकाणी पडलेले वृक्ष आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने हटविले.

चार ठिकाणी फांद्या पडल्या
नौपाडा येथील भास्कर कॉलनीमधील कर्वे रुग्णालयाजवळील रस्त्यावर वृक्षाची फांदी पडली. ठाणे महापालिकेच्या गेट नंबर एकजवळ वृक्षाची फांदी तुटून लटकत होती. ही फांदी कापून बाजूला करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ वृक्षाची फांदी तुटून रस्त्यावर पडली होती. नौपाडा येथील वीर सावरकर मार्गावरील लक्ष्मी निवास बिल्डिंगसमोर रस्त्यावर वृक्षाची फांदी पडली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85319 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top