ऐरोली स्मशाभूमीमधील गैरसोयीविरोधात मनसेचा ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोली स्मशाभूमीमधील गैरसोयीविरोधात मनसेचा ठिय्या
ऐरोली स्मशाभूमीमधील गैरसोयीविरोधात मनसेचा ठिय्या

ऐरोली स्मशाभूमीमधील गैरसोयीविरोधात मनसेचा ठिय्या

sakal_logo
By

वाशी, ता. १० (बातमीदार) ः ऐरोली सेक्टर २० येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या गैरसोयींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आवाज उठवण्यात आला आहे. यासाठी शनिवारी स्मशानभूमीच्या ठिकाणी त्यांनी ठिय्या मांडत आंदोलन केले. ऐरोली सेक्टर २० येथील स्मशनभूमीमध्ये ऐरोली सेक्टर १ ते ५, सेक्टर १६, १७, १९, २० आदी परिसरातील नागरिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी या स्मशनभूमीमध्ये येतात. येथे शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. स्मशानात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीदेखील सोय नाही. पावसाळ्यात उघड्यावर अंत्‍यविधी करावे लागतात. नवी मुंबई महापालिकेने येथील गैरसोय दूर करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85341 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top