दक्षिण मुंबईत पाणी साचू नये म्हणून कोस्टल रोड, मेट्रोच्या ठिकाणी खबरदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण मुंबईत पाणी साचू नये म्हणून कोस्टल रोड, मेट्रोच्या ठिकाणी खबरदारी
दक्षिण मुंबईत पाणी साचू नये म्हणून कोस्टल रोड, मेट्रोच्या ठिकाणी खबरदारी

दक्षिण मुंबईत पाणी साचू नये म्हणून कोस्टल रोड, मेट्रोच्या ठिकाणी खबरदारी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : दक्षिण मुंबईत गुरुत्वाकर्षणावर आधारित अशी पर्जन्य जलवाहिन्यांची रचना आहे. त्यामुळेच दक्षिण मुंबईतील छोट्या पर्जन्य जलवाहिन्यांच्या रचनेमुळे या ठिकाणी इतक्या वर्षांत पाणी साचल्याची घटना घडली नव्हती; पण गेल्या वर्षी मात्र दक्षिण मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले होते. हे पाणी साचण्यासाठी कोस्टल रोडच्या प्रकल्पाचा घातलेला भराव तसेच मेट्रोसाठी केलेले खोदकाम कारणीभूत ठरल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यामुळेच दक्षिण मुंबईत पाणी साचू नये, म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने यंदा तयारी केली आहे.

दक्षिण मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी गेल्या वर्षी सातत्याने नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच यंदा दक्षिण मुंबईत पाण्याचा निचरा होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. कोस्टल रोडच्या प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक जागी पाण्याचा विसर्ग असावा यासाठीचे चॅनेल तयार करण्यात आले आहेत. त्यामुळेच या भरावाच्या ठिकाणीही पाण्याचा निचरा होईल. कोस्टल रोड प्रकल्पाच्या सोबतच मेट्रो ३ प्रकल्पासाठीही पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित यंत्रणांनाही मुंबई महानगरपालिकेकडून आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण १०४ पाणी साचणाऱ्या फ्लडिंग स्पॉट्सपैकी ३० स्पॉटवर यंदाच्या वर्षी काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ३० ठिकाणी यंदा पाणी साचणार नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे. या कामांसाठी महानगरपालिकेने ८०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मुंबईत आणखी ७० ठिकाणी पाणी साचण्याच्या जागा आहेत. त्या ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचू शकते. त्या जागांपैकी मुंबई शहरात एकूण २५ ठिकाणे आहेत. या ठिकाणांपैकी ५ ठिकाणी यंदा काम करण्यात आले आहे. पुढील वर्षी आणखी २० ठिकाणी पाणी साचू नये, म्हणून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85343 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top