‘पार्ले-टिळक’ चे १०१ व्या वर्षात पदार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पार्ले-टिळक’ चे १०१ व्या वर्षात पदार्पण
‘पार्ले-टिळक’ चे १०१ व्या वर्षात पदार्पण

‘पार्ले-टिळक’ चे १०१ व्या वर्षात पदार्पण

sakal_logo
By

अंधेरी ता. ११ (बातमीदार) ः लोकमान्य टिळक यांची कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून पार्ले येथील नागरिकांनी पार्ले-टिळक विद्यालय असोसिएशनची ९ जून १९२१ रोजी स्थापना केली. या संस्थेने आता १०१ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या वतीने शताब्दी महोत्सव समारोह कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पद्मविभूषण प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. तसेच संस्थेचे दिलीप पेठे, अनिल गानू , स्नेहलता देशमुख व इतर उपस्थित होते. या वेळी संस्थेच्या शंभर वर्षांचा इतिहास व वाटचाल कायमस्वरूपी स्मरणात राहावी म्हणून शताब्दी गौरव ग्रंथ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. शिक्षण संस्था हा व्यवसाय नसून एक माणसातला दैवी गुण घडवण्याचे साधन आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. शताब्दी महोत्सवानिमित्त एका टपाल पाकिटाचे मुंबई विभागाच्या स्वाती पांडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85374 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top