उल्हासनगरातील १० राजकीय पक्षांना पालिकेची वॉर्निंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरातील १० राजकीय पक्षांना पालिकेची वॉर्निंग
उल्हासनगरातील १० राजकीय पक्षांना पालिकेची वॉर्निंग

उल्हासनगरातील १० राजकीय पक्षांना पालिकेची वॉर्निंग

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) ः महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी उल्हासनगरातील १० राजकीय पक्षांना वॉर्निंग लेटर जारी केले आहे. त्यात अनधिकृत जाहिराती काढल्या नाहीत तर ५ पट दंड आकारण्यात येणार आणि ही दंडाची रक्कम महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच वसूल केली जाईल, असा इशारा देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
पालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका आकाश-चिन्हे (स्काय-साईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियमा अंतर्गत फलक, कमानी, पथनाट्यप्रदर्शन, इमारत वेष्टन, जाहिरात फुगे इत्यादींच्या माध्यमातून तात्पुरत्या जाहिरात फलकासाठी महापालिकेने ठरवून दिलेल्‍या जागांवर जाहिरातींचा कालावधी तीन दिवसांपेक्षा अधिक ठेवता येणार नाही, हे जाहीर केले आहे. तसेच जाहिरात फलकांचा आकारही ठरवून दिला आहे.
आता पालिकेने उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेचा दाखला देताना पक्षाने किंवा कार्यकर्त्याने महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता लावण्यात आलेले अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स न काढल्‍यास संबंधित पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या नावांची नोंद घेऊन पाचपट दंडाची रकम ही निवडणूक प्रक्रियेदरम्यान वसूल करण्यात येईल, असे वॉर्निंग लेटर १० राजकीय पक्षांना बजावण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85378 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top