रविवारच्या सुटीला १३२ वर्षे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविवारच्या सुटीला १३२ वर्षे पूर्ण
रविवारच्या सुटीला १३२ वर्षे पूर्ण

रविवारच्या सुटीला १३२ वर्षे पूर्ण

sakal_logo
By

नितीन देशमुख, पनवेल

हक्‍काची साप्ताहिक सुट्टी म्‍हणून बहुतांश नोकरदार वर्ग रविवारची आतुरतने वाट पाहत असतो. भारतीय कामगार चळवळीचे पहिले नेते ‘रावबहादूर’ नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांशी लढा देऊन भारतीय कामगारांना हक्काची पहिली रविवारची सुट्टी १० जून १८९० ला मिळवून दिली. शुक्रवारी या घटनेला तब्‍बल १३२ वर्षे पूर्ण झाली.
कामगार चळवळीचे पहिले नेते म्‍हणून रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्‍यांचा जन्म १८४८ मध्ये ठाणे येथे झाला. त्यांनी ‘दीनबंधू’ या पत्राचे ९ मे १८८० मध्ये संपादन करण्याची जबाबदारी स्वीकारली. १८८४ मध्ये बॉम्बे मिल हॅंड्स असोसिएशनची स्‍थापना केली.
रविवारची सुट्टी मिळण्याला शुक्रवारी तब्‍बल १३२ वर्षे पूर्ण झाली, या प्रीत्‍यर्थ पनवेल महापालिकेचे नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ यांच्या नवीन पनवेल प्रभाग १७ मधील भाजपच्या संपर्क कार्यालयात रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पेढे वाटले. यावेळी महापालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, भाऊ भुजबळ, आरोग्य विभागाचे अधिकारी शैलेश गायकवाड, रुग्वेद कांडपिळे, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे वंशज पणतू गोपीनाथ वसंत लोखंडे, प्रशांत फुलपगार आदी उपस्थित होते.

ब्रिटिशांनी दिला ‘रावबहादूर’ किताब
भारतीय कामगार चळवळीचे पहिले नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी १० जून १८९० रोजी ब्रिटिश अधिकाऱ्‍‌यांविरोधात लढा देत रविवारची साप्ताहिक सुट्टी मंजूर करून घेतली. त्‍यामुळेच कामगारांसह बहुतांश नोकरदार वर्ग रविवारच्या सुटीचा आनंद उपभोगू शकतो. लोखंडे यांचे कामगारांप्रती असलेल्‍या योगदानाप्रती १८९५ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ हा किताब दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85384 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top