पार्किंग समस्येवर पालिका तोडगा काढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्किंग समस्येवर पालिका तोडगा काढणार
पार्किंग समस्येवर पालिका तोडगा काढणार

पार्किंग समस्येवर पालिका तोडगा काढणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबईकरांची पार्किंगची नेमकी आवश्‍यकता समजून घेण्यासाठी आणि पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला असून त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईतील रहिवासी सोसायट्यांकडून यासंबंधित फॉर्म भरून पार्किंगसाठी रहिवाशांना नेमकी किती आवश्‍यकता आहे याची यातून पाहणी होईल.

मुंबईत पार्किंगची अनेकदा समस्या निर्माण होते. त्यावर तोडगा म्हणून आता पालिकेने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी मुंबईतील सोसायटी किंवा इमारत व्यवस्थापकांनी या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. मुंबईतील ज्या रहिवासी सोसायट्यांना सध्या पार्किंगची सुविधा नाही, अशा सोसायट्यांना पार्किंगची सुविधा देण्याचा पालिकेचा मानस आहे. पालिका क्षेत्रात रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतुकीस येणारा अडथळा कमी करणे हे पार्किंग उपलब्ध करून देण्यामागील उद्दिष्ट आहे.

ज्या इमारतींना पार्किंगची जागा नाही, अशा सोसायट्यांना प्राधान्याने ही पार्किंगची जागा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक वॉर्डच्या सहायक आयुक्तांकडून ही जागा उपलब्ध होईल. रहिवासी इमारतीत एका कारसाठी एक पार्किंगची जागा अशा पद्धतीने ही जागा दिली जाईल. पार्किंगच्या जागेचे वितरण, खुणा करणे, सुरक्षा ही जबाबदारी रहिवासी इमारतीच्या व्यवस्थापनाची असेल. पार्किंगच्या जागेचे शुल्क प्रत्येक वर्षी सोसायटीला एक वर्ष आधीच भरावे लागेल. रहिवासी इमारतीच्या ५०० मीटर अंतरातच या धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.

फोर्ट, माटुंग्यात पार्किंगचा पर्याय
फोर्ट येथील प्रसिद्ध हुतात्मा चौक परिसरातील अप्सरा पेन शॉपसमोरील जुन्या खुल्या पार्किंगच्या जागेचा विकास करून येथे भूमिगत पार्किंग उभारले जाणार आहे; तर दुसरीकडे माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर पालिकेचे खुले पार्किंग असून तेथेही रोबोटिक एलिव्हेटेड पार्किंग उभारले जाणार आहे. हा ‘टर्न की प्रोजेक्ट’ असून कंत्राटदार आपले डिझाईन आणि इतर तांत्रिक बाबींवर आपल्या निविदा भरणार आहेत.

हुतात्मा चौक भूमिगत पार्किंग
सध्याची पार्किंग क्षमता- ५६
प्रस्तावित क्षमता- २००
अपेक्षित खर्च- ५३ कोटी

माटुंगा पूर्व रेल्वे स्थानक एलिव्हेटेड पार्किंग
सध्याची पार्किंग क्षमता- १००
प्रस्तावित क्षमता- ४००
अपेक्षित खर्च- १० कोटी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85409 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top