विद्याभवनचा १०० टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्याभवनचा १०० टक्के निकाल
विद्याभवनचा १०० टक्के निकाल

विद्याभवनचा १०० टक्के निकाल

sakal_logo
By

नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शैक्षणिक संकुलातील ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाला लागला आहे. विद्याभवनच्या विज्ञान व वाणिज्य या शाखांचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान विभागातून अमेय राजेंद्र सुरवसे हा विद्यार्थी ८७ टक्के गुण मिळवून प्रथम, तर आर्यन चंद्रशेखर यादव व वेदांगी भूषण शास्त्रकार यांनी अनुक्रमे ८६.१७ टक्के व ८१ टक्के मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य विभागातून सीमा रामसिंग खरवड ही विद्यार्थिनी ८८.८३ टक्के मिळवून प्रथम आणि अंश कुमार सिंग व स्नेहा भीमराव कांबळे यांनी अनुक्रमे ८३.८३ टक्के व ८१.३३ टक्के मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. १३० विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थ्यांनी उच्च प्रावीण्य, ९० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर २४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुणे विद्यार्थी गृहाचे माजी कार्याध्यक्ष कृ. ना. शिरकांडे, संचालक राजेंद्र बोऱ्हाडे, मुख्याध्यापिका राजकुमारी इंदलकर, तसेच सर्व शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85475 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top