
मलेरिया रुग्णांची महिती पालिकेस देणे बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : खासगी प्रयोगशाळा आणि डॉक्टरांना मलेरिया रुग्णांची माहिती पालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. खासगी आरोग्य क्षेत्रात आतापर्यंत शंभरहून अधिक रुग्ण नोंदवण्यात आले आहेत, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सूचित करण्याजोगा आजार'' या कायद्यांतर्गत कोणत्याही आजाराची तक्रार नोंदवणे सरकारी अधिकाऱ्यांना कायद्याने आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य उद्रेकाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३५ दिवसात १२४ रुग्ण खासगी आरोग्य विभागाकडून नोंदवण्यात आलेले आहेत. आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वॉर्डमध्ये एक नियुक्त मलेरिया नियंत्रण अधिकारी असतो आणि त्याचा एक ईमेल आयडी असतो, ज्यावर खासगी प्रयोगशाळा केसेसचा अहवाल देऊ शकतात. मलेरिया निर्मूलनाचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येक रुग्णाचा अहवाल मिळणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार, आम्ही आमच्या कीटकनाशक विभागाला एखाद्या विशिष्ट ठिकाणाचे सर्वेक्षण करण्यास सांगू शकतो आणि प्रजनन स्थळांना नष्ट करण्यासाठी कारवाई सुरू करू शकतो.
खासगी रुग्णालये, डॉक्टर आणि प्रयोगशाळांना मलेरियाच्या रुग्णांची माहिती पालिकेला द्यावी लागेल, असे निर्देश राज्य सरकारकडून मिळाले आहेत. खासगी आरोग्य सेवा क्षेत्रालाही यासंबंधित माहिती देण्यात आली आहे.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85478 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..