बियाणे खरेदीत काळजी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बियाणे खरेदीत काळजी घ्या
बियाणे खरेदीत काळजी घ्या

बियाणे खरेदीत काळजी घ्या

sakal_logo
By

वाडा, ता. १२ (बातमीदार) ः तालुक्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्‍‌या अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावतीसह खरेदी करावे, असे आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे यांनी केले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करताना पावतीसह खरेदी करावे. पावतीमध्ये बियाणांचा संपूर्ण तपशील, खरेदीदाराचे नाव, गाव, पीक, वाण, लॉट नंबर याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टण, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांचे पाकीट सीलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. तसेच बनावट व भेसळयुक्त बियाणांमुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी व बियाणांबाबत शंका असल्यास कृषी विभागाच्या आवाहानानुसार कृषी विभागास संपर्क साधावा. बियाणांच्या तक्रारीबाबत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा, असेही त्‍यांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85482 Txt Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top