
जन्म-मृत्यू नोंदी संगणकीकृत होणार
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील ग्रामपंचायतीचे सर्व दस्तऐवज महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत; परंतु काही जन्म व मृत्यूच्या नोंदी संगणकीकृत करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच जन्म व मृत्यूसंबंधी दस्तऐवज मिळविण्यासाठी न्यायप्रक्रियेतून जावे लागत आहे. याबाबत पालिका स्थापनेपासूनचे जन्म मृत्यूसंबंधी माहिती संगणकीकृत करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
१९९२ मध्ये नवी मुंबईत २९ गावांत असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायती महापालिकेत विलीन करण्यात आल्या. त्या वेळी सर्व दस्तऐवज पालिका प्रशासनाला बहाल करण्यात आले. त्यामध्ये जन्म-मृत्यूच्या नोंदणीसंबंधी कागदपत्रेदेखील होती. जन्म-मृत्यूसंबंधी माहिती २०१७ नंतरची माहिती संगणकीकृत करण्यात आली आहे; परंतु २०१७ च्या आधीची माहिती अजूनही संगणकीकृत करण्यात आली नसल्याने प्रमाणपत्र घेताना नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. ज्याची संगणकीकृत नोंदणी झाली नाही, ते दस्तऐवज शोधण्यास कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कार्यवाहीचे आश्वासन
जन्म व मृत्यू दाखला संगणकीकरण प्रकरणी सर्व विभाग अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील. त्यानंतर कार्यवाही होईल, असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85494 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..