आंबोजवाडी की चिखलवाडी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोजवाडी की चिखलवाडी?
आंबोजवाडी की चिखलवाडी?

आंबोजवाडी की चिखलवाडी?

sakal_logo
By

मालाड, ता. १३ (बातमीदार) ः मालवणी क्रमांक आठ येथील वस्तीत कारगिल रस्ता, मुख्य बाजार, तसेच आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर चिखल पसरला आहे. रहिवाशांना या चिखलातून वाट काढत ये-जा करणे भाग पडत आहे. जवळपास तीस हजार लोकवस्ती असलेल्या आंबोजवाडीत आजच्या घडीला डांबरी रस्तेही नाहीत. कच्च्या रस्त्यांमुळे पावसाच्या पहिल्या सरीने रस्ते चिखलमय झाले आहेत. या रस्त्यांवरून ये-जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथून जाताना रहिवाशांचे कपडे चिखलाने माखतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहन येथून जात असेल तर अंगावर घाण पाणी उडते. स्थानिकांचे म्हणणे आहे की, या वस्तीकडे स्थानिक पुढाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने पालिका प्रशासनही दुर्लक्ष करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85496 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top