
खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर प्रवेश बंद
खारघर, ता. १२ (बातमीदार) : पावसाळा सुरू होताच पर्यटक खारघर पांडवकडा धबधब्याकडे धाव घेतात. मात्र गेल्या काही वर्षांत पांडवकडा आणि तळोजा धरणात बुडून काही जणांचा मृत्यू झाल्यामुळे पांडवकडा धबधबा बंद ठेवण्याचा निर्णय खारघर पोलिस आणि पनवेल वन विभागाने घेतला आहे.
पावसाळा सुरू होताच पर्यटक खारघरमधील पांडवकडा धबधबा, तळोजा जेलसमोरील तलाव, खारघर टेकडी, सेक्टर पाच सरवस्ती अभियांत्रिकी शेजारील धबधबा, खारघर सेक्टर सहा ड्रायव्हिंग रेंजलगत असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात.
पांडवकडा धबधबा हे पर्यटनस्थळ व्हावे म्हणून पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र याविषयी सिडको आणि वन विभागकडून अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी गेल्यावर पांडवकडा धबधबा विकासाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
कोट : पांडवकडा धबधबा पर्यटन क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. खारघरमधील सर्व धबधबे आणि धरणांवर प्रवेश मनाई करण्यात आली आहे. विनापरवाना प्रवेश केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- संदीपान शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
पांडवकडा धबधबा विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत पांडवकडा धबधब्यावर आनंद घेताना अनेक तरुणांचा बळी गेला आहे. त्यामुळे हा धबधबा वन विभाग आणि पोलिसांच्या वतीने बंद ठेवण्यात येणार आहे.
- जनार्दन काळे, वन कर्मचारी, पनवेल विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85497 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..