माती वाचवा मोहीमेमुळे जनजागृतीस मदत - मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माती वाचवा मोहीमेमुळे जनजागृतीस मदत - मुख्यमंत्री
माती वाचवा मोहीमेमुळे जनजागृतीस मदत - मुख्यमंत्री

माती वाचवा मोहीमेमुळे जनजागृतीस मदत - मुख्यमंत्री

sakal_logo
By

मुंबई, ता १२ : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्‍गुरू जग्गी वासुदेव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ‘माती वाचवा’ या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा देताना पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयीही सांगितले. मातीची गुणवत्ता तसेच संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेला महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.

या वेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील सद्‍गुरु जग्गी यांच्याकडून मोहिमेदरम्यान आलेले अनुभव जाणून घेतले; तसेच पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात व्यापकस्तरावर काम सुरू आहे, असे सांगितले. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राघवेंद्र शास्त्री व त्यांचे सहकारी उपस्थित होते. मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सद्‍गुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली असून आत्तापर्यंत २७ देशांमधून २५,००० किमीची यात्रा त्यांनी पूर्ण केली आहे. देशातल्या ५ राज्यांतून फिरत ते महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85524 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top