कांदिवलीत चित्रकला स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत चित्रकला स्पर्धा
कांदिवलीत चित्रकला स्पर्धा

कांदिवलीत चित्रकला स्पर्धा

sakal_logo
By

कांदिवली, ता. १३ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील पार्वतीबाई प्रतिष्ठान सेवा संस्था आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. जुनियर केजी ते इयत्ता ७ वीमधील ४५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. रविवारी सुट्टीच्या दिवशी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन मुलांनी निसर्गचित्र, पावसाळा अशा विविध विषयांवर चित्रे रंगवली. मुलांनी खडू आणि पेन्सिलने अप्रतिम चित्रे साकारली. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना खडू आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मेडल देऊन पालकांसह सन्मानित करण्यात आले. ऑर्चिड शाळेच्या सोनल जावळे, शादाब शेख आणि मुकेश कुळे यांनी व्यवस्थापन व परीक्षण केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85549 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top