रेल्वे प्रवाशी गटाची पायी दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे प्रवाशी गटाची पायी दिंडी
रेल्वे प्रवाशी गटाची पायी दिंडी

रेल्वे प्रवाशी गटाची पायी दिंडी

sakal_logo
By

किन्हवली, ता. १३ (बातमीदार) ः ठाणे-मुंबईत नोकरी करणाऱ्या नोकरदार रेल्वे प्रवाशांची भजनी मंडळे, ट्रेकर्स ग्रुप, वर्षासहल मंडळे नेहमीच कुतूहलाचा विषय मानले जातात. मात्र, शहापूरमधील आसनगाव ते ठाणे रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमानी गेल्या दहा वर्षांपासून चेरवली मठ ते टाकेश्वर अशी पायी दिंडी काढतात. यंदा रविवारी (ता.१२) ही दिंडी काढण्यात आली. योगी फुलनाथबाबा यांच्या हस्ते या रेल्वे प्रवासी गटाचा सन्मान करण्यात आला. किन्हवलीजवळील गुंड्याचापाडा येथील रहिवासी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ कर्मचारी हरेश देसले यांच्या पुढाकाराने ही दिंडी निघण्यास सुरुवात झाली.
जून महिन्याचा दुसरा रविवार उजाडला की हे सर्व रेल्वे प्रवासी सकाळीच चेरवली मठात दाखल होतात. सिद्धयोगी ऋद्धीनाथबाबांची पालखी सजवली जाते आणि हर हर महादेवचा गजर, टाळ-मृदुंगाच्या नादात ही दिंडी निघते. मार्गात चेरवली, ॠद्धीनाथबाबा मंदिर खरीड व आपटे या गावांत या ऋद्धीनाथबाबा भक्तांची चहापानाची व्यवस्था व पालखीचे पूजन करण्यात आले. भर उन्हात ऋद्धीनाथबाबांच्या नावाचा जयजयकार करत ही दिंडी दुपारी तीन वाजता टाकीपठार येथे पोहचली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85559 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top