पनवेल पालिकेची प्रभाग रचना जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल पालिकेची प्रभाग रचना जाहीर
पनवेल पालिकेची प्रभाग रचना जाहीर

पनवेल पालिकेची प्रभाग रचना जाहीर

sakal_logo
By

पनवेल, ता. १३ (प्रतिनिधी) ः महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. नव्या रचनेनुसार पालिका क्षेत्रातील नगरसेवकांची संख्या ११ ने वाढून ८९ वर पोहोचली आहे; तर चार सदस्यीय प्रभाग पद्धतीवरून तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत झालेल्या बदलानंतर प्रभागांची संख्या २० वरून ३० झाली आहे. यातील २९ प्रभाग तीन सदस्यांचे, तर एक प्रभाग दोन सदस्यांचा आहे.
जाहीर केलेल्‍या प्रभाग रचनेवर १३ ते २४ जूनदरम्यान हरकती व सूचना मांडता येणार आहेत. २०१६ मध्ये स्थापित पनवेल पालिकेच्या सदस्यांची मुदत जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत अवलंबली गेली होती. मात्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर, आता पनवेल पालिका क्षेत्रातही तीन सदस्यीय प्रभाग पद्धत राबवली जाणार आहे.

२४ जूनपर्यंत हरकती, सूचनांना वेळ
पालिकेकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या हरकती अथवा सूचना असल्यास २४ जूनपर्यंत आयुक्तांकडे त्या लेखी स्वरूपात नोंदवायच्या आहेत. त्यानंतर हरकती वा सूचना स्‍वीकारल्या जाणार नसल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

जाहीर प्रभाग रचना
नगरसेवक- आधी-७८, आता -८९
प्रभाग - आधी- २०, आता - ३०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85562 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top