स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांचा तुटवडा
स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांचा तुटवडा

स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांचा तुटवडा

sakal_logo
By

तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : शहरात प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत स्मशानभूमी आहे. दर दिवशी किमान दोन ते तीन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात; पण अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा भार पडत आहे. त्यामुळे स्मशानभूमीत तत्काळ सुरक्षा रक्षक व कर्मचारी नेमावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी कामे करण्यासाठी कर्मचारी आहेत. त्यांना लाकडे, रॉकेल, शेणी जमा कराव्या लागतात. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र याआधीदेखील मृतदेह आणल्यावर विविध प्रकारची कामे कर्मचाऱ्यांना करावी लागतात. त्यामुळे स्मशानभूमीत उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतो. एकीकडे अंत्यसंस्कारसंबंधी कामे व दुसरीकडे नोंदणीविषयी कामे एकाच वेळी करावी लागत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे संजय अंकल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश सकपाळ यांचे म्हणणे आहे.

नातेवाईकांकडून नोंद
मृतदेह स्मशानभूमीत आणल्यानंतर त्याची नोंद वहीत करावी लागते. काही ठिकाणी कर्मचारी कमी शिक्षित असल्याने त्या ठिकाणी मृताच्या नातेवाईकांना नोंदणीसंबंधी कामे करावी लागतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85579 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top