कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडक
कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडक

कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडक

sakal_logo
By

सरळगाव, ता. १३ (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना हक्काच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकारचा निषेध करीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तालुका सेक्रेटरी कॉ. पी. के. लाली, कॉ. कविता वरे, तालुका अध्यक्ष कॉ. दिलीप कराळे, कॉ. दिनेश जाधव, सचिव मुरबाड तालुका कॉ. सागर भावार्थे आदी सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालयात या मोर्च्यातील शिष्टमंडळाच्या प्रतिनिधी तहसीलदार संदीप आवारी यांना भेटून नेहरूवाडी येथील कातकरी रस्ता, आदिम जमातीच्या लोकांना तत्काळ जात प्रमाणपत्र व शिधापत्रिका देण्यात यावे, साखरमाची येथील आदिवासी कुटुंबाचे तत्काळ पुनर्वसन करणे आदींसह ५७ मागण्यांचे निवेदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85586 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top