पालघर जिल्ह्याला स्वतंत्र कलादालन असावे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्याला स्वतंत्र कलादालन असावे!
पालघर जिल्ह्याला स्वतंत्र कलादालन असावे!

पालघर जिल्ह्याला स्वतंत्र कलादालन असावे!

sakal_logo
By

कासा, ता. १३ (बातमीदार) ः सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संपन्न झाले. या साहित्य संमेलनात अनेक विषयांवर चर्चा झाली. या संमेलनात पालघर जिल्हा कलाध्यापक संघाचा मोठा सहभाग होता. जिल्ह्यातील अनेक कलाशिक्षकांनी आपली चित्रे सादरीकरण करण्यासाठी कलादालनात मांडली होती. या साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटक महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी कलादालनास भेट देऊन कलाशिक्षकांचे कौतुक केले. या वेळी पालघर जिल्हा कलाध्यापक संघातर्फे पालघर जिल्ह्यात स्वतंत्र कलादालन असावे यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.
कलाध्यापक संघाच्या वतीने केलेल्या मागणीचा नक्कीच विचार करू, असे आश्वासन गोऱ्हे यांनी या वेळी दिले. या वेळी महाराष्ट्र राज्य महिला विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढण, पालघर जिल्हा कलाध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल घरत, अध्यक्ष रूपेश वझे, सचिव नितीन जैतकर आदी उपस्थित होते.

कलादालनाला मान्यवरांची भेट
संमेलनासाठी आलेले ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, लेखिका मोनिका गडकर, स्मिता पाटील, राजश्री पाटील यांनी कलादालनास भेट दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85594 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top