ऑस्ट्रेलियाच्या राजाची लालाबागमध्ये पाद्यपूजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑस्ट्रेलियाच्या राजाची लालाबागमध्ये पाद्यपूजा
ऑस्ट्रेलियाच्या राजाची लालाबागमध्ये पाद्यपूजा

ऑस्ट्रेलियाच्या राजाची लालाबागमध्ये पाद्यपूजा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : सातासमुद्रापार जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या राजाचे आज जल्लोषात आगमन झाले असून लालबागमध्ये या राजाचा पाद्यपूजन सोहळा दिमाखात पार पडला. लालबागच्या मूर्तिकारांनी ही २१ फुटी मूर्ती नुकतीच पूर्ण केली आहे. या मूर्तीची सोमवारी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात आली असून आता मूर्तीची ऑस्ट्रेलिया वारी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे कित्येक हजार कि.मी.चा प्रवास करून जेव्हा ही गणेशमूर्ती ऑस्ट्रेलियात पोहोचेल तेव्हा अनेक नवे विक्रम या मूर्तीच्या नावे नोंदवले जातील.

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरात २०१६ मध्ये स्थापन झालेल्या युनायटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया या संघटनेने आपल्या पहिल्या वर्षापासून गणेशोत्सव अगदी जोरदार साजरा करण्याची परंपरा सुरू केली. या बाप्पाला इथले स्थानिक ऑस्ट्रेलियाचा राजा म्हणतात. तसेच अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव समितीमध्ये नोंद असलेला हा एकमेव परदेशी बाप्पा आहे. पहिल्या वर्षी लालबागच्या राजाचे मूर्तिकार मनोहर बागवे आणि सदानंद बागवे यांनी ही मूर्ती साकारली होती. पहिली मूर्ती सुमारे १२ फूट उंच तर होतीच, पण त्या वेळी ती भारताबाहेरची सर्वांत मोठी गणपती मूर्ती होती. या वर्षी मात्र ऑस्ट्रेलियाच्या राजाची वेगळीच शान आहे. ॲडलेडमध्ये हा उत्सव ३ आणि ४ सप्टेंबर या दोन दिवशी साजरा होईल, असे मंडळाचे भारतातील संपर्कप्रमुख राजेंद्र झेंडे यांनी सांगितले. यामध्ये द. ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर, सांस्कृतिक मंत्री आणि इतर अनेक मान्यवरांचा सहभाग आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणीस, राज्यपाल कोश्यारी, स्मृती इराणी, राजनाथ सिंह, विनोद तावडे अशा अनेक मान्यवरांनी मंडळाच्या या उत्सवाचे पत्राद्वारे कौतुक केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85620 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top