विधान परिषद निवडणुकीत सावधगिरी बाळगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधान परिषद निवडणुकीत सावधगिरी बाळगणार
विधान परिषद निवडणुकीत सावधगिरी बाळगणार

विधान परिषद निवडणुकीत सावधगिरी बाळगणार

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १४ (बातमीदार) ः राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला असून विधान परिषदेच्या निवडणुकीत सतर्कता बाळगून महाविकास आघाडी रणनीती ठरवून विजय प्राप्त करेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
अंबरनाथ येथे रविवारी (ता. १२) खडसे खासगी कार्यक्रमासाठी आले होते. येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांच्या कार्यालयात त्यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीवर आपले मत व्यक्त केले. सूर्योदय सोसायटीच्या अध्यक्षा शोभा शेट्टी, नरेंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे, माजी नगरसेवक सचिन पाटील, तसेच कमलाकर सूर्यवंशी आदींनी खडसे यांचे स्वागत केले.
राज्यसभा निवडणुकीत आघाडीला निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास होता; पण थोडे दुर्लक्ष झाल्याने शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. हा पराभव महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागला आहे. या निकालामुळे ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येक बाब निरखून, पारखून आणि विश्वासाने घ्यावी लागेल. राज्यसभा निवडणुकीतील अपयशामुळे त्याची पुनरावृत्ती घडणार नाही, यासाठी सावधगिरी बाळगून रणनीती ठरल्याचे खडसे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85659 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top