
सह्याद्री सोसायटीला कमी दाबाने पाणीपुरवठा
नेरूळ, ता. १४ (बातमीदार) : सानपाड्यातील सेक्टर ८ मधील प्लॉट नं. ५० वर असलेल्या सह्याद्री सोसायटीच्या रहिवाशांना गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग आमले यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत पाणीसमस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
सह्याद्री सोसायटीत १० इमारती असून १६० सदनिका आहेत. या सोसायटीला ८० मिमी व्यासाच्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या काही महिन्यांपासून या सोसायटीमध्ये पाईपलाईनमधून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासनाच्या उपअभियंत्यांनी या सोसायटीत ६ जून २०२२ रोजी पाहणी केली आहे. पाण्याचा दाब कमी असल्याने १२० मिमी व्यासाच्या पाईपलाईन पाण्याची आवश्यकता आहे. येथील रहिवाशांनी याविषयीही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे; मात्र अद्याप पाणीसमस्या सुटलेली नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85680 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..