शैक्षाणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षाणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी
शैक्षाणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी

शैक्षाणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी

sakal_logo
By

भिवंडी, ता. १४ (बातमीदार) ः शालेय विद्यार्थ्यांची शाळा बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे शालेय वस्तू खरेदी करण्यासाठी भिवंडी परिसरातील बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. महागाईमुळे शैक्षणिक साहित्याच्या किमतीदेखील वाढल्या असल्याने पालक नाराजी व्यक्त करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून सर्वसाधारणपणे शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे शालेय संस्था व शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये सॅनिटायझरची फवारणी करून शाळा स्वच्छ केल्या आहेत. प. अण्णासाहेब जाधव विद्यालय, प. रा. विद्यालय, नवभारत इंग्लिश स्कूल अशा अनेक शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी विविध शालोपयोगी वस्तू व साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे, अशी माहिती दुकानदार महेंद्र माडकर यांनी दिली.
लहान मुलांची दप्तरे, छत्री, रेनकोट, पाण्याच्या बाटल्या, वह्या, पुस्तके व पेन असे साहित्य दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने पालकवर्ग साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करू लागला आहे. दप्तर, रेनकोट व छत्र्यांची किंमत १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहे. भिवंडी शहरातील पारनाका बाजारपेठ, तीनबत्ती चौक, नजराणा रोड, धामणकर नाका, वंजारपट्टी नाका, कल्याण रोड तसेच पूर्णा, काल्हेर, कशेळी, खारबाव, कोनगाव अशा विविध भागांत असलेल्या दुकानांमध्ये शैक्षणिक वस्तू खरेदीसाठी महिलांसह नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. या भागातील रस्ते अरुंद असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

कोट...
बुधवारपासून शाळा सुरू होत असल्यामुळे सरकारच्या आदेशानुसार धामणकर नाका येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात ‘प्रवेशोत्सव’ कार्यक्रम आयोजित केला आहे. या वेळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्प व वही देऊन स्वागत केले जाणार आहे.
- सुधीर घागस, मुख्याध्यापक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85712 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top