पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत
पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत

पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत

sakal_logo
By

किन्हवली, ता. १४ (बातमीदार) ः रोहिणी नक्षत्राचे नऊ ते दहा दिवस उलटूनही पावसाच्या सरी बरसल्या नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. दिवसेंदिवस वाढते तापमान व सायंकाळी भरून येणारे काळेकुट्ट ढग यामुळे पावसाचे अनुकूल वातावरण तयार होत असले, तरी पाऊस पडतच नसल्याने पेरण्यांच्या तयारीत असलेला बळीराजा चिंतेत पडला आहे.
२५ मे पासून सूर्याने रोहिणी नक्षत्रात संक्रमण केले असून या काळात पुढचे नऊ ते दहा दिवसांत तापमानात बदल होऊन पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. कोकणात साधारण मेअखेरीस व जूनच्या सुरुवातीला सलामी देणाऱ्या वळवाच्या पावसाने मात्र यंदा चकवा दिला आहे.
सुमारे दहा दिवसांपासून दररोज ढगाळ वातावरण व सायंकाळी चमकणाऱ्या विजा यामुळे आजतरी पाऊस पडेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी पूर्वमशागतीची कामे उरकली आहेत.
जूनच्या सुरवातीस तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान देखील झाले. मात्र त्यांनतर तालुक्यात केवळ ऊन व सोसाट्याचा वारा असेच वातावरण कायम आहे. यंदा अर्धा जून सरला तरी उन्हाळाच सुरू आहे. वाढते तापमान आरोग्याला हानिकारक ठरत आहे. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्यांचेही आकाशाकडे डोळे लागले आहेत. पावसाचे आगमन लांबल्याने बळीराजाबरोबरच सर्वजण चिंतेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85714 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top