बँक ऑफ महाराष्ट्रचा आयकॉनिक सप्ताह उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँक ऑफ महाराष्ट्रचा आयकॉनिक सप्ताह उत्साहात
बँक ऑफ महाराष्ट्रचा आयकॉनिक सप्ताह उत्साहात

बँक ऑफ महाराष्ट्रचा आयकॉनिक सप्ताह उत्साहात

sakal_logo
By

ठाणे, ता. १४ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे आयकॉनिक सप्ताह साजरा करण्यात आला. हा सप्ताह ६ ते ११ जूनदरम्यान ठाणे आणि पालघर जिल्हा येथे आयोजित केला होता.
आयकॉनिक सप्ताहाचाच एक भाग म्हणून ८ जून रोजी नियोजन भवन ठाणे कलेक्टर कार्यालय येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डीपीओ ठाणे कलेक्टर कार्यालय सुनील जाधव, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कार्यपालक निदेशक ए. बी. विजयकुमार, बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे झोनचे प्रबंधक नर्मदा सावंत, जिल्हा अग्रणी बॅंकचे मुख्य व्यवस्थापक जयनन्द भारती आणि १४ राष्ट्रीयीकृत बॅंकांचे अंचल प्रबंधक उपस्थित होते. या वेळी प्रमुख अतिथी ए. बी. विजयकुमार बॅंक ऑफ महाराष्ट्र कार्यपालक निदेशक यांनी सभागृहात उपस्थित बचतगट कर्ज लाभार्थी आणि अन्य सरकारी योजनांच्या कर्ज लाभार्थी यांना जन धन योजनेचे महत्त्व सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85726 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top