विरोध न करता विकास कामे करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरोध न करता विकास कामे करा
विरोध न करता विकास कामे करा

विरोध न करता विकास कामे करा

sakal_logo
By

वडाळा, ता. १४ (बातमीदार) ः केवळ विरोधासाठी विरोध न करता विकासाची कामे करा, असा टोला शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी सोमवारी (ता. १३) दहिसर कांदरपाडा येथे बांधण्यात आलेल्या वाहतूक पुलाच्या उद्‍घाटन सोहळ्यात विरोधकांना लगावला.
दहिसर पश्चिम, कांदरपाडा येथील दहिसर नदीवरून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नव्याने बांधण्यात आलेल्या वाहतूक पुलाचे उद्‍घाटन सोमवारी घोसाळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना घोसाळकर यांनी शिवसेना जात-धर्म न मानता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार जनतेची कामे करून फक्त विकासकामांकडे लक्ष देत असल्याचे सांगितले. मात्र विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करून जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वाहतूक पुलामुळे नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे ते म्हणाले.
हा पूल झाल्याने स्थानिक नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या पाठपुराव्याने माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या अथक प्रयत्नाने हा पूल बांधण्यात आला आहे. या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, माजी नगरसेवक मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, दहिसर विधानसभा संघटक कर्णा अमीन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85741 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top