आदिवासी कुटुंबांच्या जीवनात हिरवळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी कुटुंबांच्या जीवनात हिरवळ!
आदिवासी कुटुंबांच्या जीवनात हिरवळ!

आदिवासी कुटुंबांच्या जीवनात हिरवळ!

sakal_logo
By

डहाणू, ता. १४ (बातमीदार) ः आदिवासी भागातील ११ गावांमध्ये आदिवासींचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्याचबरोबरीने त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन स्थलांतर रोखण्यासाठी अदाणी फाऊंडेशन, नाबार्ड आणि बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सुरू केला आहे. डहाणू अदाणी औष्णिक विद्युत केंद्राच्या सीएसआर फंडातून स्वतःची जमीन असलेल्या एक हजार आदिवासी कुटुंबांना एक एकरची वाडी विकसित केली; तर १०० भूमिहीन आदिवासी कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.
या उपक्रमात फळबाग, फुलशेती आणि भाजीपाला लागवड करण्यात येत आहे. त्यासाठी चार कोटी ७२ लाख ४४ हजार गुंतवणूक करण्यात आली असून, त्यात अदाणई फाऊंडेशनची आणि नाबार्डची दोन कोटी ३६ लाख २२ हजार रुपयांची भागीदारी आहे. या दोन संस्थांबरोबरच बायफ ही संस्थादेखील सहभागी आहे. या उपक्रमात प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याला फळझाडे लागवडीसाठी ३० आंबा कलमे तसेच जांभूळ, काजू, शेवगा या जातीची प्रत्येकी १५० रोपे वाटप करण्यात आले आहेत; तर फूलशेती प्रत्येकी ३०० मोगरा रोपे वाटप करण्यात आली आहेत. याशिवाय पालेभाज्यांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जामशेत, आंबेसरी, गांगणगाव येथील लाभार्थी शेतकरी नरेश भिलाडा, विष्णू हाल्या काकड, लक्ष्मण कवडे यांनी सांगितले, की शेतवाडीसाठी बोअरवेल वर इलेक्ट्रॉनिक मोटार सोलर पॅनल जोडली असून पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतमाल विक्रीसाठी एकत्रित बाजारपेठ मिळण्यासाठी महालक्ष्मी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था निर्माण करण्यात आली आहे. तिच्या माध्यमातून उत्पादित शेतमाल मुंबई, दादर, वाशी मार्केटमध्ये पाठवण्यात येतो. या संस्थेचे ११०० आदिवासी शेतकरी भागधारक असून, त्यांना बाजारपेठांचा लाभ मिळत आहे.

किमान एक लाख उत्पन्न मिळणार
अदानी फाऊंडेशन, नाबार्ड आणि बायफ या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प २०१६ ते २०२३ या काळात राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत किमान अर्धा एकर जमीन असणारा शेतकरी लाभार्थी असून, अशा एक हजार कुटुंबांची निवड करण्यात आली आहे. सहा वर्षांनंतर प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न किमान एक लाखावर मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85742 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top